Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगावगंभीर गुन्ह्यातील जळगावच्या दोन आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार..

गंभीर गुन्ह्यातील जळगावच्या दोन आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार..

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तब्बल ८ गुन्हे दाखल असलेल्या टोळीने गुन्हे करणारा आशुतोष ऊर्फ आशू सुरेश मोरे (२१, रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी) व दीक्षांत ऊर्फ दादू देवीदास सपकाळे (१९, रा. मेहरुण) या दोन जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. तसे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी १७ ऑक्टोबर रोजी दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आशुतोष देवरे आणि दीक्षांत सपकाळे या दोघांविरुद्ध एमआयडीसी व शनिपेठ पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे असे वेगवेगळ्या प्रकारचे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक फौजदार अतुल वंजारी पोलीस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, इम्तियाज खान यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. डीवाय.एस.पी. संदीप गावित यांनी या प्रस्तावाची चौकशी केली. चौकशीअंती दोघांना दोन वर्षांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले.

या हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे यांनी पाहिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या