Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजळगावातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कासमवाडीतील विहिरीत आढळल्याने खळबळ ; नातेवाईकांचा आक्रोश..

जळगावातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कासमवाडीतील विहिरीत आढळल्याने खळबळ ; नातेवाईकांचा आक्रोश..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरात गेल्या तीन महिन्यात मुलं व मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला..दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव शहरातील लक्ष्मीनगरात राहणारा ३o वर्षीय तरूण हा शनिवार ३० मार्च रोजी सकाळी सहा वाजेपासून बेपत्ता झाला होता.तो घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध अनेक ठिकाणी घेतला मात्र तो मिळून आला नव्हता..त्याचा मृतदेह कासमवाडीतील विहिरीत आढळून आल्याची घटना मंगळवार २ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे दृश्य पहायला मिळाले.

पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भूषण भोळे हा तरूण जळगाव शहरातील लक्ष्मीनगरात वास्तव्याला होता. भूषण याला अध्यात्मिक क्षेत्रात विशेष रुची होती.. स्वभावाने संयमी व शांत होता.अविवाहित होता. शनिवार ३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्यांनी घरात कुणाला काहीही न सांगता तो घरातून निघून गेला. याबाबत रविवारी ३१ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची रितसर नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कासमवाडी येथील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

आत्महत्या आहे की विहिरीत घसरला ? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुकेश पाटील, नितीन ठाकूर, ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अंगावरील कपडे, बोटातील अंगठी आणि गळ्यातील तुळशीमाळ यावरून मयताची ओळख पटविण्यात आली. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रतिलाल पवार हे करीत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान भूषण भोळेच्या या दुर्दैवी घटनेने परिवार व नातेवाईकांमध्ये शोकाकुल वातावरण आहे..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या