जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव येथील गजबजलेल्या फुले मार्केटला दुचाकींनी अक्षरशः वेढा दिल्याचे चित्र दररोज दिसून येते.याकडे जळगाव महापालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
येथील फुले मार्केटमध्ये जिकडे पाहावे तिकडे वाकड्या तिकड्या स्वरूपात दुचाकी लावलेल्या असतात . येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो.
पार्किंगची अधिकृत जागा कुठेही नसल्यामुळे ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी वाहनधारक आपली दुचाकी लावत असतात. सर्वत्र दुचाकी लावत असल्याने पायी चालणाऱ्यांना मात्र अत्यंत त्रास होतो. पायी चालण्यासाठी जागा देखील मार्केटमध्ये राहत नाही. तशातच मार्केटमध्ये सर्वच ठिकाणी लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय सुरू केल्याने अजिबात जागा राहत नाही.
वरील सर्व परिस्थिती माहिती असून देखील महानगरपालिका आयुक्तांसह अधिकारी, पदाधिकारी असे सर्वजण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे जणू त्यांना काहीही घेणेदेणे नाही, असे दिसून येते.
दरम्यान या कृत्याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे.