Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजामनेर: कौटुंबिक वाद...चाकूने वार करीत पत्नीची हत्या ; आरोपी पतीला अटक..!

जामनेर: कौटुंबिक वाद…चाकूने वार करीत पत्नीची हत्या ; आरोपी पतीला अटक..!

जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) दुपारी साडेचार वाजता घडली. या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.मृत महिलेचे नाव अनिता उर्फ मिनाताई बाळू मोरे (वय ४५, रा. मुंदखेडा, ता. जामनेर) असे आहे. आरोपी पतीचे नाव बाळू विश्वनाथ मोरे असे असून, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.

गुरुवारी दुपारी अनिता मोरे यांनी घरी जाण्यास नकार दिल्याने पुन्हा वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी बाळू मोरे याने संतापाच्या भरात पत्नीवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनिता गंभीर जखमी झाली. कुटुंबीय व शेजाऱ्यांनी तात्काळ तिला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या