Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगावजामनेर एलआयसी कार्यालयात गुरू वंदना उपक्रम साजरा...

जामनेर एलआयसी कार्यालयात गुरू वंदना उपक्रम साजरा…

जामनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शिक्षक दिनानिमित्त जामनेर येथील एलआयसी कार्यालयात सर्व जीवन विमा प्रतिनिधींनी त्यांच्या मार्गदर्शकांचा हृद्य सत्कार आयोजित केला होता.जामनेर तालुक्याचे एल आय सी चे विकास अधिकारी संजय व्ही. देवरे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील सर्व एलआयसीचे जीवन विमा प्रतिनिधी सदैव उपकृत झालेले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जामनेर एलआयसी कार्यालयात ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विकास अधिकारी संजय देवरे यांनी सर्व जीवन विमा प्रतिनिधी यांना जीवनाचे अनमोल धडे दिले. जीवन विमा एजन्सीच्या माध्यमातून समाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे हित संवर्धन कसे करता येईल याचे विवेचन त्यांनी केले.जीवन विमा एजन्सी हा सध्याच्या काळात आर्थिक उन्नती साधण्याचा उत्तम रोजगार पर्याय आजच्या तरुणांसाठी उपलब्ध आहे. कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता एल आय सी सल्लागार म्हणून तरुण आपले करिअर यशस्वीपणे उभे करू शकतात.आजही अनेक तरुण त्यांच्या मार्गदर्शनाने फुल टाईम किंवा पार्ट टाइम काम करून या व्यवसायात आपले भविष्य उज्वल करत आहेत.याप्रसंगी जामनेर एलआयसी कार्यालयात गजानन मंगळकर, गोपाळकृष्ण देहाडराय, बालाजी भंडारे, सतीश माळी, सुनील साबळे, तेजराव काळे, प्रमोद शहाणे, अनिल सोनार इत्यादी विमा प्रतिनिधींनी देवरे यांचा सत्कार करून गौरव केला व गुरुवंदना अर्पण केली. यावेळी आयोजकांनी समाजातील सर्व स्तरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आवाहन केले आहे की त्यांनी सुद्धा विकासाधिकारी संजय व्ही देवरे यांचे मार्गदर्शन घ्यावे व एल आय सी या शासकीय उपक्रमात सहभागी होऊन रोजगाराची संधी प्राप्त करावी.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या