जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जामनेर नगर परिषदेच्या वतीने थकबाकीदार नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या **’अभय योजने’**ला आजपासून अधिकृत सुरुवात झाली असून, याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज नगर परिषद कार्यालयात माजी सन्मानीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक पार पडली. बैठकीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी योजनेचे सविस्तर मार्गदर्शन केले.यामध्ये योजनेचे उद्दिष्ट, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया यांसह सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. उपस्थित नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले आणि याचवेळी अर्ज वाटप करून प्रत्यक्ष धनादेश स्वीकारले गेले.
मुख्याधिकारी यांनी सांगितले की,
“अभय योजना ही थकबाकीदार मालमत्ता धारकांसाठी दिलासा देणारी योजना असून, नागरिकांनी संधीचे सोने करावे.” या योजनेद्वारे थकीत करांवर सवलत मिळणार असून, शासकीय लाभ प्रक्रियाही सुलभ होणार आहे.
नगर परिषदेचे आवाहन:
सर्व पात्र नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा. ही सुवर्णसंधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.