जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जामनेर शहरातील सोनबर्डी परिसरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनी युक्त जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली. सदर ट्रॅक नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरत आहे. येथील नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे. या जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि नियमित व्यायामाच्या सवयीला चालना देण्याचा हेतू आहे. परिसरामध्ये स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. सर्व वयोगटातील नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत.
या पाहणी दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिकारी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.