नशिराबाद येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; महिला आघाडीची स्थापना, मान्यवरांचा गौरव
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून जनतेच्या प्रश्नांशी जोडलेली एक सशक्त चळवळ आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे हीच खरी सेवेची ओळख असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नशिराबाद येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी डीगंबर रोटे अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या कार्यालयाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
आपल्या भाषणात पालकमंत्री म्हणाले की, पदापेक्षा कार्याला अधिक महत्त्व असून प्रामाणिक काम करणाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळत असतो. नशिराबादमधील कार्यकर्त्यांची एकजूट व जनतेशी असलेले आत्मीय नाते प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांना नेतृत्वात संधी देणे आवश्यक असून त्यांच्या सहभागातून स्थानिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी पंकज महाजन यांनी पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यालयाचा शुभारंभ केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. नगरसेविका व माजी जिल्हा परिषद सदस्या लीना महाजन यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
कार्यालयाचे लोकार्पण
नशिराबाद शहरातील विठ्ठल मंदिरासमोरील खालची आणि होळी मैदान परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या पत्नी नगरसेविका व माजी जिल्हा परिषद सदस्या लीना महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

महिला आघाडीची घोषणा
कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या नशिराबाद शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. हेमाली पाटील यांची शहरप्रमुखपदी, तर चारुताई पाटील, आशाताई पाटील आणि जागृती रोटे यांची अनुक्रमे विविध पदांवर निवड करण्यात आली. महिला आघाडीच्या फलकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

मान्यवरांचा गौरव
नशिराबाद नगरपालिकेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पीएचडी प्राप्त करणारे सुभाष तळले, ‘खानदेश रत्न’ पुरस्कार विजेते बांधकाम सभापती विकास पाटील, मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे, ए.पी.आय.योगिता नारखेडे, मनपा स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेले प्रदीप रोटे, तसेच संभाजीनगर येथे बजाज कंपनीत जनरल मॅनेजर पदावर नियुक्त झालेले नितीन पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता पांढरकर यांनी केले. प्रस्ताविक लीना महाजन यांनी तर आभार प्रदर्शन डी.एस.पाटील यांनी केले.या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ), उपनगराध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजक पंकज महाजन, बांधकाम सभापती विकास पाटील, कैलास व्यवहारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील, नगरसेवक किर्तीकांत चौबे, चेतन बऱ्हाटे, भारतीबाई धनगर, मन्यार कमरुनिसा सय्यद, बिस्मिल्ला, विकास धनगर, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, रवी कापडणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, राजेंद्र चव्हाण, मार्केटचे माजी सभापती श्याम सोनवणे, गोकुळ चव्हाण, यश सपकाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, हर्शल मावळे, शहर प्रमुख रोटे, यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महिलांचीही लक्षणीय उपस्थिती यावेळी दिसून आली.

