Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजनसंज्ञापन विभाग आयोजित 'द्विदशक वर्षोत्सव'....

जनसंज्ञापन विभाग आयोजित ‘द्विदशक वर्षोत्सव’….

औरंगाबाद/पोलीस दक्षता लाईव्ह:– मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विभागाने आयोजलेल्या ‘द्विदशक वर्षोत्सव’ व्याख्यानमालेचे दुसऱे पुष्प सुकीर्त गुमास्ते सरांनी आज गुंफले. त्यांनी मीडियातील विविधता व व्याप्ती सांगत विद्यार्थ्यांबरोबर दिलखुलास बातचीत केली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी डिजिटल मीडिया मधल्या संधी, त्यात येणाऱ्या अडचणी यांबद्दल मार्गदर्शन केले. माध्यमांच्या बदलत्या स्वरुपाबरोबरच त्यातील वाढत चाललेल्या संधी मार्ग यांवर त्यांनी या व्याख्यानातून प्रकाश टाकला.यावेळी विभाग प्रमुख प्रा. संतोष शेणई, प्रा. सानिका कुलकर्णी व प्रा. स्वप्नील कांबळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या