मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- मुख्यामंत्र्यांनी मराठ्यांच्या जुन्या ‘कुणबी’ नोंदीच्या आधारावर त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी दाखला देण्याचा निर्णय रात्री २:३० वाजता घेतला गेला आहे. त्याचे राजपत्र घेऊन मुख्यमंत्री वाशी येथे उपोषणस्थळी उपस्थित झाले. आरक्षणाबाबत असा निर्णय घेऊन सरकारने ओबीसी आरक्षणावर वरवंटा फिरवला आहे. ओबीसी नेत्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाची प्रत मनोज जरांगेंना सुपूर्द केली असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत दाखल होताच मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करत स्वागत करण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मंत्री मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन सभेस्थळी पोहचले होते.