जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- शहरात गेल्या १५ दिवसांपासून घरफोड्या, भुरट्या चोऱ्या या वाढतच चालल्या असून पोलीस खाते निष्क्रिय होत चालले आहे.गुन्हेगारांवर त्यांचा वचक राहिलेला नाही याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.
शहरातील नवी पेठ परिसरातील जेष्ठ प्रेस फोटोग्राफर सतिश जगताप यांच्या फोटो स्टुडीओतून विविध वस्तूंची चोरी झाली आहे.या चोरीप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांची वक्रदृष्टी आता फोटो स्टूडीओकडे देखील वळली असल्याचे या घटनेच्या निमित्ताने म्हटले जात आहे.
जळगाव शहरातील नवीपेठ परिसरात प्रेस फोटोग्राफर जगताप यांचा मार्तंड फोटो या नावाने स्टुडीओ आहे. या स्टुडीओतून 17 व 18 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री चोरीची घटना घडली. या घटनेत दोन कलर फोटो प्रिंटर, झेरॉक्स मशिनचे स्पेअर पार्ट, न्यायालयीन, आयकर आणि दुकानशी संबंधीत कागदपत्र यासह इतर वस्तूंची सुमारे 32 हजार रुपये मुल्याची चोरी झाली आहे. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे करत आहेत.