Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याला ₹५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याला ₹५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या पथकाने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला ₹५,०००/- लाच घेताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई २४ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जिल्हा दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधीक्षक (वर्ग २) म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १४ जुलै रोजी पगार बिलाच्या संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयात भेट दिली असता, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती माधुरी सुनिल भागवत (वय ३८) यांनी कोणतीही त्रुटी न दाखवता पगार बिल पुढे पाठवण्यासाठी ₹१२,०००/- लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने लाच न देता, २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. पडताळणी दरम्यान, आरोपी अधिकारी यांनी ₹१०,०००/- लाचेची मागणी मान्य करून त्यापैकी ₹५,०००/- प्रथम हप्त्यात घेण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे, दिनांक २४ जुलै रोजी तक्रारदाराकडून ₹५,०००/- पंचासमक्ष स्वीकारताना त्या रंगेहाथ पकडल्या गेल्या.

या प्रकरणात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या