Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeजळगावजिल्हातील 20 पोलिस अंमलदारांचे उपनिरीक्षकपदावर पदोन्नतीचे आदेश पारित

जिल्हातील 20 पोलिस अंमलदारांचे उपनिरीक्षकपदावर पदोन्नतीचे आदेश पारित

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निःशस्त्र पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्याचे आदेश काढले आहेत.

जिल्हा पोलिस दलातील विभागीय अर्हता परीक्षा २०१३ उत्तीर्ण केलेल्या २० अंमलदारांची निःशस्त्र पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. यात १४ जणांची कोकण-२ विभागात, तर ६ जणांची नाशिक विभागात पदस्थापना झाली आहे.

पोलिस उपनिरीक्षक मो.अली सत्तार अली सय्यद (भुसावळ शहर), प्रताप पाटील (मसुप, चाळीसगाव), शशिकांत पाटील (पहूर), नितीन चव्हाण (यावल), प्रकाश महाजन (एएसपी कार्यालय, चाळीसगाव), संजय जाधव (पोलिस मुख्यालय), सहाय्यक फौजदार शेख युनूस (स्थानिक गुन्हा शाखा), नरेंद्र कुमावत (जिविशा), शशिकांत पाटील (जिविशा), रामदास पावरा (चोपडा शहर), प्रदीप सुरवाडे (मसूप, पाळधी), मिलिंद शिंदे (मेहुणबारे), संजय भांडारकर (रामानंदनगर), नाशिक विभाग : ग्रेड पीएसआय भास्कर पाटील (दविक, जळगाव), देविदास बाथ (पोलिस मुख्यालय), राजेंद्र साळुंखे (चाळीसगाव ग्रामिण), हंसराज मोरे (पहूर), सहाय्यक फौजदार भाऊसाहेब पाटील (एसडीपीओ, चाळीसगाव), हवालदार महेंद्र पाटील (एसडीपीओ, फैजपूर).

सामान्य प्रशासन विभागाच्या ७ मे २०२१ च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल अनुमती याचिकेच्या (क्रमांक २८३०६/२०१७) अंतिम आदेशाच्या अधीन राहून ही पदोन्नतीचे पदे भरली आहेत. पदोन्नती झालेल्या अंमलदारांना दप्तराचा कार्यभार, शासकीय किट, ओळखपत्र व साहित्य पोलिस मुख्यालयात तातडीने जमा करून मंगळवारी (ता. ६) दुपारी जळगाव जिल्हा पोलिस दलातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या