Wednesday, February 11, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावतर्फे ‘आंबापाणी’ येथे जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावतर्फे ‘आंबापाणी’ येथे जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी देशभर ‘जनजातीय गौरव दिन’ साजरा केला जातो. दि १६ नोव्हेंबर रविवार रोजी या दिवसाचे औचित्य साधून एम क्यू एस एम शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांच्या निर्देशानुसार व नेतृत्वाखाली यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे वाघझिरा जवळील दुर्गम ‘आंबापाणी’ गावात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन बनसोड उपस्थित होते. आगमनानंतर त्यांचे आदिवासी पारंपारिक नृत्याने जोरदार स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत सांस्कृतिक नृत्य सादर करून कार्यक्रमाला उर्जित प्रतिसाद दिला.सचिव पवन बनसोड यांनी आदिवासी वस्तीचे प्रत्यक्ष निरीक्षण करून स्थानिकांशी संवाद साधत त्यांची अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्या विविध समस्या मांडत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे निवेदनही सादर केले. समस्यांच्या निवारणासाठी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष आर. एस. जगताप यांनी भूषविले. त्यांनी आदिवासी बांधवांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावल वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. जी. कवडीवाले यांनी वनअधिकार कायदा (FRA) संदर्भात माहिती दिली, तर अ‍ॅड. अतुल भास्कर यांनी सर्वसामान्य कायद्याविषयी मार्गदर्शन केले.पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत लाभ कसा मिळवावा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारूळकर यांनी केले तर आभार अ‍ॅड. याकूब तडवी यांनी मानले.या प्रसंगी एपीआय अजयकुमार वाढवे, यावल वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. जी. कवडीवाले, आरएफओ बी. के. थोरात, राऊंड ऑफिसर विपुल पाटील, पत्रकार बंधू, वरिष्ठ लिपिक प्रमोद ठाकरे, संतोष तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच अ‍ॅड. के. डी. सोनवणे, अ‍ॅड. रियाज पटेल, अ‍ॅड. भूषण महाजन, अ‍ॅड. शेखर तडवी, ॲड. नितीन कोळी, वनविभागाचे चेतन शेलार, अशोक राठोड, विपुल पाटील आदींनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारसिंग बारेला (अध्यक्ष JFM), दिला पाटील, हुकाऱ्या बारेला, जंगलू महाराज, डेब्या जिऱ्या, इदा पुट्ट्या, अशोक राठोड, यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजिव तडवी, कर्मचारी आकाश पाटील, राजू तडवी (बेलीफ), अविनाश पोफळे, राहुल चव्हाण, समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बढे आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या