जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम (RTI) या विषयावर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी ४ वाजता पार पडले. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन डॉ. विजयता सिंह, सहायक प्राध्यापक, एस. एस. मनियार लॉ कॉलेज, जळगाव यांनी केले. त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियमाचे महत्त्व, त्याची अंमलबजावणी आणि प्रशासनातील पारदर्शकतेवर दिला जाणारा भर याविषयी सविस्तर माहिती दिली.
प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करताना माहिती अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी कशी व्हावी, यावर भर दिला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच इतर शासकीय कार्यालयातील प्रतिनिधींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
RTI कायद्यामुळे प्रशासन पारदर्शक राहते आणि सामान्य नागरिकांना शासनविषयक माहिती सहज उपलब्ध होते, हे या प्रशिक्षणातून अधोरेखित झाले.