जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महसूल दिन २०२५ पूर्वी निश्चित उद्दिष्टांची शंभर टक्के पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात प्राप्त झालेल्या तक्रारी व समस्यांचे तातडीने निराकरण करावे, असेही सांगण्यात आले. महसूल मंडळ पातळीवर प्रगतीचा नियमित आढावा घेऊन संबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीदरम्यान जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निर्मिती प्रक्रियेबाबत कायदे, नियम व कार्यपद्धतीवर लघु प्रशिक्षणही घेण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी नागरिकाभिमुख प्रशासनावर भर देत निश्चित उद्दिष्टे गाठण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले.