Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणजिल्हाधिकारी आपल्या बांधावर; शेतकऱ्यांना ई-पीक पेरा लावण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी आपल्या बांधावर; शेतकऱ्यांना ई-पीक पेरा लावण्याचे आवाहन

नशिराबाद/मुख्य संपादक चंदन पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या ई-पीक पाहणी तसेच माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिकपेरा प्रात्यक्षिकाला भेट दिली. व शेतकऱ्यांना ई-पीक पेरा लावण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

आज दि.१४ सप्टेंबर रोजी नशिराबाद येथे तहसीलदार, तालुका मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी तसेच ई-पीक पेरा लावण्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रात्यक्षिक आयोजित केले होते. सर्व शेतकऱ्यांना तहसील कार्यालय,जळगाव व नगरपरिषद नशिराबाद यांच्यामार्फत प्रात्यक्षिकाला निमंत्रित केले होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळ्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करीत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी व्हर्जन २ डाऊनलोड करायला लावले. व पुढील सूचना देत शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या मोबाईल मधून पीक पेरा कसा नोदवितात ते समजवून दिले. काही शेतकऱ्यांचा पीक पेरा स्वतः शेतकऱ्यानंबरोबर चर्चा करून नोंदवून घेतला. पिक पेरा न लावल्यास आपणास शासनाचे कोणतेही लाभ मिळू शकत नाहीत किंवा पुढील अडचणी येतील व ई-पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांची बाकी असेल ते शेतकरी पिक पाहणी न केल्यामुळे पिकविमा पासून वंचित राहू शकतात. ई पीक पाहणी मुळे आपला मालकी हक्क सिद्ध होतो. ई-पीक पाहणी डाटा हा डिजिटल स्वरूपात असल्याने भविष्यात कायदेशीर बाबींसाठी अती महत्वाचा असून शासकीय पुरावा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, असे काही महत्वाचे मुद्दे शेतकऱ्यांना लक्षात आणून दिले. गावातील लोकप्रतीनिधी यांनी या मोहिमेत भाग घेऊन तसेच तलाठी आणि नगरपंच्यायत यांच्या सहकार्याने गावातील शेतशिवाराचे काही गट वाटून घ्यावेत.आणि प्रत्येक गटात पिकपेरा लावण्यापासून वंचित शेतकऱ्यांनपर्यंत पोहोचून त्यांना पीक पेरा लावून देण्याचे काम करावे अशी सूचना त्यांनी केली. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आतापर्यंत २०२३ या हंगामात एकूण ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी खरीप विमा उतरविल्याची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिका दरम्यान दिली. या वेळी तहसीलदार जळगाव नामदेव पाटील तलाठी नशिराबाद रुपेश ठाकूर मंडळ अधिकारी नशिराबाद आशिष वाघ, कृषी अधिकारी वाल्हे, प्रवीण सोनवणे,लांडगे, माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, योगेश पाटील, किरण पाटील, जितेंद्र महाजन, राजू पाचपांडे, किरण तळेले, मनोज रोटे, भुषण कोल्हे, चंदू भोळे, ललित बऱ्हाटे, विकास वाणी,तसेच गावातील तमाम शेतकरी वर्ग उपस्थित होता .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या