Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावलाच घेताना रंगेहाथ कारवाई ; जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व खाजगी व्यक्तीस अटक

लाच घेताना रंगेहाथ कारवाई ; जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व खाजगी व्यक्तीस अटक

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील सहायक महसूल अधिकारी आणि एका खाजगी व्यक्तीस दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी करण्यात आली. तक्रारदाराने गावातील अतिक्रमण प्रकरणासंदर्भात १६ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांच्या प्रतीसाठी अर्ज केला होता. या अर्जाची प्रक्रिया लवकर करण्याच्या मोबदल्यात संबंधित आरोपींनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निदर्शनास आले.

पडताळणी दरम्यान, खाजगी इसम संजय दलाल यांनी “शासकीय शुल्क १४०० आणि आमचे ६००” असे सांगून एकूण २००० रुपये लाच मागितली. आरोपी प्रशांत ठाकूर यांनी लाच स्वीकारण्यास सहकार्य केले. त्यानंतर सापळा रचत लाच रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. तपासात ८८० रुपये शासकीय शुल्क आणि उर्वरित ११२० रुपये लाच असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सापळा पथकामध्ये सहा. पो.उ.नि. सुरेश पाटील, पोना बाळू मराठे व पो.कॉ. अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या