Friday, March 27, 2026
police dakshta logo
Homeजळगावजिल्हाधिकारी पदासाठी निवड झालेल्या लेकीचा जाहीर सत्कार

जिल्हाधिकारी पदासाठी निवड झालेल्या लेकीचा जाहीर सत्कार

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पातुर येथील रहिवासी कु. रेणुका दिनेश केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश संपादन करून जिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्याबद्दल तिचा लाडवंजारी युवा संघटना, मेहरूण यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कु. केकन हिला सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांनी तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास समाजातील पदाधिकारी, महिला मंडळ सदस्य, ज्येष्ठ नागरिक, विविध घटकांचे प्रतिनिधी तसेच युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळून यश संपादन करावे, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजन लाडवंजारी युवा संघटना, मेहरूण (जळगाव) यांच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना नाईक, सोनल लाडवंजारी, वैशाली लाडवंजारी, लता सानप, नीता लाडवंजारी, लता पाटील, मीना चाटे, वैशाली चाटे, शितल सानप, अनिता पाटील, जिजाबाई पाटील, मिराबाई पाटील, कविता लाडवंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या