जळगांव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव येथील मायादेवी मंदीर महाबळ समोरील पशुसंवर्धन विभागाच्या मागील बाजूस जिल्हा शासकीय ग्रंथालय असून आज रोजी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शासकीय ग्रंथालयाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीत 02 सुसज्ज वाचनालये असुन त्यात एकावेळी 250 विद्यार्थ्यांना वाचनासाठी सुविधा उपलब्ध आहे. ग्रंथालयाय कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू असते.
जिल्हा शासकीय ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुविधा नि:शुल्क उपलब्ध असून, ग्रंथालयात विविध मासिके, कादंबरी, ग्रंथ, पुस्तके, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अशी पुस्तके उपलब्ध आहेत. त्यासाठी मासिक शुल्क रु. 150 आकारले जाते. या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्षाची सुविधा ही उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना संगणकावरुन आवश्यक टिपणे काढुन वाचनासाठी उपयोगात आणता येतील.ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अधिकाधिक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत या दृष्टीने शासकीय कार्यक्रम बैठकांमध्ये पुष्पगुच्छऐवजी पुस्तके भेट देण्याचा उपक्रम यापूर्वीच जिल्ह्यात सुरु करण्यात आला असून त्याद्वारे मिळालेली पुस्तके ग्रंथालयात वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
या वेळेत सुरू असते ग्रंथालय
दैनंदिन कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकली 10 ते 5 या वेळेत जिल्हा शासकीय ग्रंथालय हे वाचकांसाठी उपलब्ध असते. जिल्हा शासकीय ग्रंथालय हे मायादेवी मंदीर महाबळ समोरील पशुसंवर्धन विभागाच्या मागील बाजूस आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालय व वाचनालय सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेवुन ज्ञानार्जन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांचाकडूंन करण्यात येत आहे.