Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावजिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तालुका निवड चाचणी स्पर्धा १५ ऑक्टोबरला..

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तालुका निवड चाचणी स्पर्धा १५ ऑक्टोबरला..

अमळनेर /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- तालुका कुस्तीगीर संघ संघातर्फे जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तालुका निवड चाचणी स्पर्धा रविवार दि.१५ रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी वजन ८ ते १० या वेळेत होणार आहे. कुस्त साडेदहा वाजेपर्यंत सुरू होतील, अशी माहिती देण्यात आली.

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या इनडोअर हॉलमध्ये ही चाचणी स्पर्धा होणार आहे. यासाठी गादी गट व माती गट ५७ कि, ६१ कि, ६५ कि, ७० कि, ७४ कि, ७९ कि, ८६ कि, ९२ कि, ९७ कि, १२५ कि. वजनी गटात होणार आहे.

अधिक माहितीसाठी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विश्वास संतोष पाटील (बाळू), संजय कौतिक पाटील, हाजी शब्बीर पैलवान, प्रताप अशोक शिंपी, संजय पैलवान, रावसाहेब पाटील, भरत पवार प्रवीण कुमार पाटील यांचेशी संपर्क साधावा. खेळाडूचे वय १८ वर्ष वरील असावे. तांत्रिक समिती मोबाईल नंबर 9970936510 आणि 9284349552 .. येताना आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत घेऊन यावी, असे अमळनेर तालुका कुस्ती संघाने कळवले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या