Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजिल्ह्यातील चार आरोपी हद्दपार; गुन्हेगारी जगतात खळबळ

जिल्ह्यातील चार आरोपी हद्दपार; गुन्हेगारी जगतात खळबळ

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या चार गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले असून गुन्हेगारीवर्गाचे धाबे दणाणले आहे.

गुन्हेगारी वर्गावर लक्ष ठेऊन असलेले जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करीत नशिराबाद तसेच धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (42), आरीरफ शेख तस्लीम खान (24), असलम खान अयाज खान (30, सर्व रा. कुरेशी मोहल्ला) टोळी सदस्य असून या टोळीवर नशिराबाद, एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, धरणगाव, पहूर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. या सोबतच कासोदा पोलीस ठाण्यामध्ये अमीन हुसेन शेख (रा. उत्राण, ता. एरंडोल) याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल होते.त्यानंतर त्याच्यावर दोन प्रतिबंधक कारवाया झाल्या होत्या. मात्र त्यानंतरही संशयिताच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने याच्यावरही हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार त्याला देखील जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या