जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या पाच दिवसांपासून मुंबईकर जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे त्रस्त झाले असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.मुंबईसह कोकण पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेला दवखील बसला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. पावसामुळे मंगळवारी आणि बुधवारी मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली तर काही रेल्वेगाड्या रद्द झाल्याने खान्देशातील प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. रेल्वे रुळांवर पाणी तुंबल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यात राजधानी एक्स्प्रेससह धुळ्याकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. तर बहुतांशी रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याने अनेक प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे.
जळगाव रेल्वेस्थानकावर गेल्या दोन दिवसांपासून रात्री ९ वाजता येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस मोठ्या विलंबाने धावल्याने नवी दिल्लीसह भोपाळकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तर, या पावसामुळे आता अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन्सदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावतीकडून येणाऱ्या गाड्या नाशिकपर्यतच जात असल्याने मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे.
या गाड्या रद्द
मुंबई ते धुळे एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०११), धुळे ते मुंबई एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०१२), अमरावती ते मुंबई एक्स्प्रेस नाशिकपर्यंत (गाडी क्रमांक १२११२)
या गाड्या विलंबाने
मुंबई ते जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१८८), मुंबई ते नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१३९), मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२२२१), मुंबई ते ते बल्लारशाह एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११००१), मुंबई ते हावडा दुरांतो एक्स्प्रेस, दादर ते गोरखपूर विशेष (गाडी क्रमांक ०१०२७). आदी गाड्या आहेत.