Friday, March 27, 2026
police dakshta logo
Homeजळगावजुना हायवे परिसरात श्रीराम नवमी निमित्त वृक्षारोपण; संवर्धनाची घेतली शपथ

जुना हायवे परिसरात श्रीराम नवमी निमित्त वृक्षारोपण; संवर्धनाची घेतली शपथ

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील जुना हायवे परिसरात श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वड, कडुनिंब, करंज, पिंपळ यांसारख्या देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड पर्यावरणप्रेमींच्या हस्ते करण्यात आली.स्वर्गीय वेदांत नाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर मनोज चौधरी, वसंत पाटील, प्रवीण पाटील, पीतांबर कोळी, रितेश निकम, पंकज नाले यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेत “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश दिला.

दरम्यान, श्री स्वामी समर्थ केंद्राच्या पर्यावरण प्रकृती विभागामार्फत वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. लागवड केलेल्या झाडांचे उन्हाळ्यात संवर्धन करण्याची जबाबदारी अशोक बेकरीचे संचालक संजय भावसार यांनी स्वीकारली.तप्त जळगाव शहराला हरित व थंड वातावरण देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या