Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगावजुन्या पॉवर ट्रिलरला रंगरंगोटी करून त्यास बनावट वेष्टन लावून धरणगावच्या वृद्धेला फसविले;...

जुन्या पॉवर ट्रिलरला रंगरंगोटी करून त्यास बनावट वेष्टन लावून धरणगावच्या वृद्धेला फसविले; गुन्हा दाखल

धरणगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जुन्या पॉवर ट्रिलरला रंगरंगोटी करून त्यास बनावट वेष्टन लावून तालुक्यातील आव्हाणी गावातील वृद्ध महिलेची तब्बल २ लाख ४० हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्नपूर्णा खंडेराव पाटील (वय ७२, रा.आव्हाणी ता. धरणगाव) या वयोवृद्धा कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात टिलर करण्याचे साहित्य घेण्यासाठी पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर (रा. नेवासा, ता. शेगाव, जि.अहमदनगर) यांच्याशी १४ मार्च ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी संपर्क साधला होता.
त्यात २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे पॉवर टिलर घेण्याचे ठरले आणि रक्कमही देण्यात आली.खेडकर याने वृद्ध महिलेला ठरल्याप्रमाणे पॉवर ट्रिलर न देता किर्लोस्कर कंपनीचे बनावट लेबल लावून जुन्या मशीनला कलर देऊन ते नवे असल्याचे भासवत जुनेच पॉवर ट्रिलर दिले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्नपूर्णा पाटील यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली. शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अहमदनगर येथील पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर यांच्याविरोधात धरणगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या