Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणजुन्या वादातून अमळनेरात हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

जुन्या वादातून अमळनेरात हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामकृष्ण पाटील असे अमळनेर येथील जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाचा मित्र रतीलाल सुभाष पाटील याने या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

दि.10 सप्टेबर रोजी रात्री रामकृष्ण पाटील या तरुणास मंगळग्रह मंदीर रस्त्यावर सनी सुरेंद्र अभंगे, सचिन सुरेंद्र अभंगे व ज्योती जितेंद्र अभंगे (तिघे रा. कंजरवाडा चोपडा रोड अमळनेर) या तिघांनी जुन्या वादातून शिवीगाळ करत धारदार चाकूने वार करुन गंभीर दुखापत केली. लोखंडी रॉड, सळई आणि चाकूचा या हल्ल्यात वापर करुन त्यास ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या