धरणगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- धरणगाव पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, जुन्या भांडणाच्या कारणावरून किराणा दुकानदाराला अश्लिल शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, मोहम्मद मोईनुद्दीन सैफद्दीन शेख (वय-३२) रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव येथे हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. धरणगाव येथील बेलदार शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये त्याचे किराणा दुकान आहे, त्याच किराणा दुकानावर तो आपला उदरनिर्वाह करतो.काही दिवांपूर्वीच्या जुन्या वादातून दि.६ जानेवारी शनिवार रोजी सकाळी ११.३० वा. दरम्यान रियाजोद्दीन शेख लाडजी, शेख प्यारा शेख लाडजी, शेख लियाकत शेख प्यारा, जाहीद शेख प्यारा, शहनाजबी शेख रियाजोद्दीन आणि सिद्दिक शेख रियाजोद्दीन सर्व रा. धरणगाव यांनी मोहम्मद मोईनुद्दीन याला अश्लील शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता या घटनेबाबत तक्रार नोंदविण्यात आली असून ६ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.