Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणकडगाव तलाठी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना ई-पिकपेरा लावण्याचे आवाहन

कडगाव तलाठी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना ई-पिकपेरा लावण्याचे आवाहन

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाच्या वतीने ई- पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन टू मार्फत शेताचे पीक पेरे नोंदवण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून सर्व शेतकरी बांधवांनी आपले शेताचे पीक पेरे त्वरित मोबाईल ॲपमार्फत नोंदवावे असे आवाहन तलाठी कार्यालय कडगाव यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.पीक पेरा नोंदवला नसल्यास पीक विमा व इतर अनुदान, शासकीय लाभ याबाबत अडचणी उद्भवतात, तसेच सातबारा उताऱ्यावर पीकपेरा नोंदही होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मोबाईल ॲपद्वारे पिकपेरा नोंदवावा. हे पिक-पाहणी ॲप्स प्ले स्टोअरवर e peek pahani version २ या नावाने उपलब्ध आहे. मराठी भाषेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला आपला पीक पेरा नोंदवता येतो. ‘माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीकपेरा’ संबंधित ॲप्स वापरतांना मोबाईल ॲपमधून पेरा नोंदवण्यास काही अडचण उद्भवल्यास तलाठी कार्यालय कडगाव येथे संपर्क करू शकता असे तलाठी कार्यालय कडगाव यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या