Wednesday, November 20, 2024
police dakshta logo
Homeआरोग्यकै.अण्णासाहेब सिध्दप्पा करोले यांच्या प्रथम पुण्यस्मृतिदिना निमित्त संपूर्ण जळगांव जिल्ह्यात दिवसभर विविध...

कै.अण्णासाहेब सिध्दप्पा करोले यांच्या प्रथम पुण्यस्मृतिदिना निमित्त संपूर्ण जळगांव जिल्ह्यात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन…

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिस्टस अँड प्रॅक्टिशनर्स (ACLAP) या महाराष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना करण्यासाठी जीवाचे रान करणारे संस्थापक अध्यक्ष , कै. अण्णासाहेब सिध्दप्पा करोले यांच्या प्रथम पुण्यस्मृतिदिना निमित्त आज संपूर्ण जळगांव जिल्ह्यात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिस्टस अँड प्रॅक्टिशनर्स (ACLAP) या महाराष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना करण्यासाठी केले जीवाचे रान…

संपुर्ण महाराष्ट्रभर इतरत्र विखुरलेल्या डि. एम. एल. टी. आणि तत्सम पदविका , पदवी धारक प्रयोगशाळा तंत्रज्ञ बंधुभगिनींना एका सुत्रात बांधण्याचा निर्णय घेऊन तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड धावपळ करत , स्वतःच्या वयाचा आणि आजाराचा विचार न करता महाराष्ट्र भरातील तमाम तंत्रज्ञाच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य वाहुन घेणारे , त्यांचे व्यवसाय व संसार सुखकर करण्यासाठी अगदी प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून सर्व टेक्नॉलॉजीस्ट बांधवांना एकत्र करून असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिस्टस अँड प्रॅक्टिशनर्स (ACLAP) या महाराष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना करण्यासाठी जीवाचे रान करणारे संस्थापक अध्यक्ष , परमश्रद्धेय कै. अण्णासाहेब सिध्दप्पा करोले याचा काल प्रथम पुण्यस्मृतिदिन होता. त्यानिमित्त जळगांव जिल्ह्यात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

स्व.अण्णा साहेब करोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त जळगांव ACLAP संघटने तर्फे आज दिनांक 09।02।2024 रोजी विविध कार्यक्रम घेण्याचे आयोजन केले होते.त्याचाच एक भाग म्हणून काल सकाळी ठीक 9.00 वाजता शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र येथे तेथील मुलांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रथम स्व:आण्णा ना आदरांजली वाहण्यात आली. त्यात सदस्य डॉ प्रभू व्यास व इतर सदस्यांनी रक्त दान केले. विक्रमी 125 व्यानदा रक्तदाते डॉ प्रभू व्यास यांचा सत्कार ACLAP परिवार तर्फे करण्यात आला.जवळच मागास वस्तीतील मुलांना खाऊ वाटण्यात आला.कार्यक्रमात सर्वात शेवटी पांझरापोळ गोशाळेत जाऊन गोसेवा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम यशस्विते साठी ACLAP जळगांव जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील, डॉ प्रभू व्यास, रामकृष्ण रावतोळे, हरिष सोनार, प्रमोद सोनार यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाला चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितिनदादा विसपुते यांची विशेष उपस्स्थिती लाभली त्यांनी यादरम्यान मुलांसाठी थोडा वार्मअप करून घेतला.

जळगाव,चाळीसगाव,चोपडा, पाचोरा,अमळनेर, यावल, रावेर इत्यादी ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन..

चाळीसगाव तालुक्यातील सर्व सभासदांनी स्व. आण्णासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करून मोफत मधुमेह शिबिरास सुरवात केली.

पाचोरा येथील स्व.कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालय येथील विध्यार्थ्यांना सायंकाळाच्या भोजनासाठी. पाचोर Aclap असोसिएशन तर्फे रोख रकमी 3100 रुपये देऊन. स्वर्गीय आण्णांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला.

चोपडा महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा येथे युवतीसभेत 65 युवतींचे रक्त गट तपासून दिले. कै.आण्णा साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित CBC & RBSL मोफत तपासणी….. अतुल क्लिनिकल कॉम्प्युटराईज लॅबोरेटरी चोपडा यांच्या मार्फत करण्यात आली.आण्णांच्या प्रथम पुण्य्मरण दिना निमित्त श्री. पन्नालाल महाजन (साई क्लिनिकल लॅब धानोरा प्र अडावद चोपडा )मार्फत मोफत मधुमेह (रक्तातील साखर ) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

यावल रावेर aclap संघटने ने अण्णांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

अमळनेर व पारोळा येथे ही विविध कार्यक्रमाचे आयोजन.

ग्रामिण रुग्णालय अमळनेर येथे डॉ. प्रांजली पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व डॉ. गिरीश गोसावी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मुख्य उपस्थितीत सुमारे ५०-५२ रुग्णांना फलोहार वाटपाचा कार्यक्रम अतिशय शिस्तीत पार पडला , त्यानंतर अमळनेर तालुक्यातीलच कावपिंप्री व लागून असलेल्या पारोळा तालुक्यातील इंधवे या गावातील शालेय विद्यार्थ्यांचे मोफत रक्त गट तपासणी शिबिर आयोजीत करून त्यात ३०० च्यावर विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी केले. दुपारनंतर वंजारी खपाट तालुका पारोळा येथील शासकीय अनुदान नसलेल्या खासगी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या परिश्रम मतिमंद निवासी शाळा येथील ६५ विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात म्हणुन एक मोठा मिल्टन कंपनीचा थर्मास तसेच जिवन शिक्षणं मूल्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वस्तु व सोबत फलाहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला , सायंकाळीं शिवधाम पारोळा रोड येथे स्वर्गीय आण्णासाहेब करोले यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम भावपुर्ण वातावरणात पार पडला. आजच्या या संपुर्ण दिवसभराच्या विविध उपक्रमात ॲक्लाप संघटनेचे अमळनेर येथील उदयकुमार खैरनार अण्णा, सुनिल पाटील, भटू पाटील, शरद शेवाळे, संजय मुसळे, प्रतिभा मराठे, श्रुती शिंदे, अमोल शहा, किशोर सुर्यवंशी, गोपाळ पाटील मनोज सुर्यवंशी, महेंद्र साळुंखे, दत्तप्रसाद बडगुजर , आनंद शिंदे, महेश जैन ई. साऱ्या सदस्यांनी आपला सहयोग दिला.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या