चोपडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनने वन्यप्राणी संरक्षणात दाखवलेली प्रावीण्य दखल घेण्याजोगी आहे. काळवीट या वन्यप्राण्याची शिकार करुन त्यांचे मांस व शिंगे वाहतूक करत असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस हवालदार राकेश तानकु पाटील व पोलीस कॉन्स्टेबल गजानन मच्छिंद्र पाटील यांना गोपनिय माहितीनुसार मोटारसायकल क्रमांक एम पी १० एन सी ४८५७ वरून काळवीटाचे मांस व शिंगे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देऊन त्यांनी छापामारीसाठी मार्गदर्शन केले.
नियोजित नाकेबंदी दरम्यान, चोपडाकडून वैजापुरकडे जात असलेल्या मोटारसायकलवरून काळवीटाचे दोन शिंगे आणि मांस जप्त करण्यात आले. आरोपींनी आपली ओळख वांगऱ्या फुसल्या बारेला (४८), रा. टाक्यापाणी, ता. वरला (म.प्र.) आणि धुरसिंग वलका बारेला (४५), रा. बरुड, ता. खरगोन (म.प्र.) असे दिली.
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमांनुसार त्यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई केली जात आहे.