कानळदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– ग्रामीण शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यालय, कानळदा येथे 1999 च्या एसएससी बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा 10 ऑगस्ट 2025 रोजी आनंदमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एन. पाटील सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून 1999 साली अध्यापन करणारे माजी शिक्षक – कुमावत सर, श्रीमती तायडे मॅडम, व्ही. बी. मोरे मॅडम, श्रीमती आर. एस. महाजन मॅडम, मोरे सर, मिस्त्री सर, बी. ए. सपकाळे सर, बी. व्ही. पाटील सर, एस. एस. पाटील सर तसेच आजी शिक्षक उपस्थित होते. सुमारे 50 ते 60 माजी विद्यार्थी मेळाव्यास हजर होते. जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलचा आपला अभिमान व्यक्त केला. “शाळेने आम्हाला घडविले, आयुष्याला योग्य दिशा दिली,” अशा भावना व्यक्त करत, शाळेस सदैव सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.
या निमित्ताने शाळेला डायस भेट देण्यात आला तसेच शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या. उपस्थितांनी त्या काळातील तासिका, हजेरी, खेळ, गप्पा अशा जुन्या क्षणांचा आनंद घेतला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
धैर्यशील चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सुवर्णा राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव चव्हाण, प्रमोद लोहार, सुनिता पवार, किशोर भंगाळे, योगेश महाजन, प्रा. विजय भोई आणि इतर माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.