Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकांदा निर्यातबंदी शिथिल करणेबाबत आ.आहेरांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

कांदा निर्यातबंदी शिथिल करणेबाबत आ.आहेरांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना कांदा निर्यात बंदी संदर्भात लागू करण्यात आलेल्या धोरणाबाबत पत्र देण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्यात तसेच चांदवड-देवळा मतदार संघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. चालू वर्षी पुरेसा पाऊस पडला नसला तरी शेतक-यांनी पाण्याचे विकत टैंकर मागवून कांद्याला पाणी पुरवले असून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाला आहे. परंतु कांद्याचे दर नियंत्रणात आणण्याकरीता काल रात्री कांदा निर्यात बंदी संदर्भात आलेल्या परिपत्रकामुळे कांद्याचा भाव अचानक कमी झाल्याने नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या आवारात तसेच राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.

त्यामुळे तत्काळ कांदा निर्यात बंदी संदर्भात लागू करण्यात आलेल्या धोरणात शिथिलता आणण्याबाबत आपल्या स्तरावर प्रयत्न व्हावेत असे पत्र आमदार डॉ राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या