Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी वर्ग चिंतेत..

कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी वर्ग चिंतेत..

अमरावती/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:– काही दिवसापासून अनेक भागातील शेतकरी चिंतेत आहे तर काही शेतकरी सुखावले आहेत, पण सध्या कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. आता बागायत कपाशीचे बोन्ड फुटले आहेत. वेचणीला देखील सुरवात झाली आहे.परंतू कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे उत्पदक शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात. शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असते. परंतु सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना लागली आहे. अमरावती जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवरती कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सुरवातीलाच बोंड अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

अमरावती जिल्ह्यातील निंबोरा बोडखा येथील नामदेव वैद्य या शेतकऱ्यांनी १७ एकरावरती कपाशीची लागवड केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांना कपाशीचे उत्पादन कमी होणार असल्याने चिंता सतावते आहे. दुसरीकडे सध्या स्थितीत जर बाजार भाव कपाशीचा बघितला तर ७ हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या