Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeएरंडोलकासोदा पोलीसांची धडाकेबाज कारवाई : तलवार बाळगणारा इसम ताब्यात

कासोदा पोलीसांची धडाकेबाज कारवाई : तलवार बाळगणारा इसम ताब्यात

एरंडोल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- दि. २९ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कासोदा पोलीसांनी अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करत त्यास ताब्यात घेतले आहे.

फरकांडे चौफुलीजवळ एक इसम हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती प्रभारी अधिकारी श्री. निलेश राजपुत यांना मिळताच पोलीस अंमलदार नरेंद्र पाटील व सोनु पाचुंदे यांना तत्काळ रवाना करण्यात आले. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता इसम नामे राघव रामा कुवर (रा. कोळबल्ली चेंबर गलवाडा रोड, कासोदा) हा हातात धारदार तीन फुट लांबीची तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीती व दहशत पसरवीत असल्याचे दिसून आले. त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून तलवार जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात सपोनि निलेश राजपुत, पोउनि धर्मराज पाटील, ग्रेड पोउनि रामकृष्ण पाटील, पोहेका नितीन सुर्यवंशी, पोहेका राकेश खोंडे, पोहेका श्रीकांत गायकवाड, पोका निलेश गायकवाड, पोका योगेश पाटील व पोका दिपक देसले सहभागी होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या