केंद्रीय वित्त मंत्रालयातील डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू (राजस्व विभाग) या खात्याचे संचालक म्हणून नियुक्ती
जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- वरिष्ठ सनदी अधिकारी अमित गुणवंत भोळे यांची केंद्रीय वित्त मंत्रालयातील डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू (राजस्व विभाग) या खात्याचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ते मूळचे जळगावकर असून ही एक जळगावकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
अमित भोळे यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे
प्रथमतः २०१० साली संदीप गुणवंत भोळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (आयसीएएस) भारतीय नागरी लेखा सेवा परिक्षेत यश संपादन केले व ते केंद्रीय वित्त मंत्रालयात रूजू झाले. त्यापूर्वी त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत काम केले होते. काही कालावधी नंतर त्यांनी ओएसडी म्हणून तत्कालीन राज्य मंत्री संजय धोत्रे यांच्या सोबत कामकाज पाहिले.सन २०२१ साली त्यांची अर्थ मंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. जीएसटी, प्राप्तीकर यांच्यात समन्वय साधण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. आताही या पदावरच ते कार्यरत होते.
अशातच आता अमित गुणवंत भोळे यांना पदोन्नती मिळाली असून ते आता केंद्रीय अर्थ मंत्रालयात डायरेक्टर अर्थात संचालक म्हणून नियुक्त झाले आहेत. याबाबतचे आदेश दिनांक २९ डिसेंबर रोजी निघाले आहेत. वृत्तानुसार दि. १ जानेवारीपासून त्यांना या पदावर पदोन्नती मिळणार आहे. अर्थात ते आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस हा नवीन पदावर कार्यभार घेऊन सुरू करणार असून त्यांच्यासाठी ही नववर्षाची मोठी भेट असणार आहे.
अमित गुणवंत भोळे यांची शैक्षणीक कारकीर्द
अमित गुणवंत भोळे यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रीकीतूनसन २००० साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. यानंतर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथून मार्केटींग मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केला. तर २०१९ साली त्यांनी शासकीय सेवेत असतांना पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये एम.ए. पूर्ण केले. त्यांनी २०१० साली केंद्रीय नागरी लेखा सेवा परिक्षेत यश संपादन करून केले.
वेब रत्न ऍवॉर्डने देखील सन्मानीत
अमित भोळे हे अतिशय उत्तम लेखक असून. ते आपल्या ब्लॉगवरून विविध विषयांवर लिखाण करत असतात. त्यांना केंद्र शासनाच्या वेब रत्न ऍवॉर्डने देखील सन्मानीत करण्यात आले आहे.