जळगाव /प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह :- केंद्रीय गृहमंत्री भाजपा नेते अमितभाई शहा यांचा आजचा दौरा ५ मार्च, मंगळवारी निश्चित झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.त्याअनुषंगाने भाजपकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. शहरातील सागर पार्कवर युवा संमेलनासह सभेची जंगी तयारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. शहरातील सागर पार्क मैदानावर त्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेबाबतच्या उपाययोजना व जिल्हा प्रशासनाकडून व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मागील महिन्यातही दौरा निश्चित झाला होता. मात्र त्यांचा दौरा काही कारणास्तव स्थगित झाला होता. आता पुन्हा त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे.केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या. दौऱ्याच्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी प्रचारासह कार्यकर्त्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. शहरातील सागर पार्क मैदानावर मंडप उभारण्याच्या कामास वेग दिला आहे.जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी मंत्री अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्याचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे.
जळगाव शहरात निघाली रॅली..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या आजच्या सभेच्या आधी काल जळगाव शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात ना. गिरीश महाजन, पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण, डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.