खालिद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची, भ्रामक आणि ऐतिहासिकदृष्ट्या तथ्यहिन माहिती देण्यात आल्याने संपूर्ण राज्यातील शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या चित्रपटावर तातडीने बंदी आणावी, अशी मागणी विविध शिवप्रेमी संघटनांनी आणि इतिहास अभ्यासकांनी केली आहे.
या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते, तसेच रायगडावर मशिद उभारली होती, असे दाखवण्यात आले आहे. मात्र हे सर्व दावे इतिहासाशी विसंगत व कोणत्याही अधिकृत ऐतिहासिक स्रोतांमध्ये नमूद नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.“शिवकालीन पत्रांमध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी परकीय फौजांचा विरोध स्पष्टपणे व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांची इतकी मोठी संख्या सैन्यात होती, हा दावा केवळ अफवा आणि विकृतीकरण आहे,” असा युक्तिवाद तक्रारकर्त्यांनी केला आहे.

इतिहासाचे हेतूपुरस्सर विकृतीकरण करून शिवाजी महाराजांना ‘धर्मनिरपेक्ष’ दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे.तक्रारकर्त्यांनी पुढील गोष्टींची मागणी केली आहे:चित्रपटातील सर्व दावे तज्ज्ञांच्या (भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य अभिलेखागार, इ.) पडताळणीनंतरच मान्य करावेत.आक्षेपार्ह दृश्ये व संवाद त्वरित हटवावेत.
ऐतिहासिक दाव्यांची पुष्टी होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे.भारतीय संविधानातील अनुच्छेद १९(२) नुसार सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या माहितीवर निर्बंध घालावेत.
तक्रारीत असाही उल्लेख आहे की, जर “उदयपूर फाइल्स” सारख्या चित्रपटावर बंदी लावली जाऊ शकते, तर “खालिद का शिवाजी” या चित्रपटात तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे तत्काळ बंदीची कारवाई व्हावी.
निवेदन देणाऱ्यांमध्ये हिंदू जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गौसेवक परिवार, भुसावळ, तसेच शिवसेना (शिंदे गट) या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.रितेश जैन, दीपक धांडे, उमेश जोशी, भूषण महाजन, योगेश लोखंडे, भावेश पाटील, गौतम जाधव, शुभम रुमकर, किरण पाठे, सावन अग्रवाल, अनिकेत साळी, चेतन ठाकूर, सागर भोई, अंकित सोनवणे, जगदीश ठाकूर आणि इतर अनेक शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला.