Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापूर्णा नदीवरील खामखेडा पूल स्थळाची पाहणी ; संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन सतर्क

पूर्णा नदीवरील खामखेडा पूल स्थळाची पाहणी ; संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन सतर्क

खामखेडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्णा नदीवरील खामखेडा पूल बांधकाम स्थळाची पाहणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोले आणि जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी स्थळाला भेट दिली.

नदीपात्रातील पाण्याची संभाव्य वाढ आणि त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या पूरस्थितीची पूर्वतयारी म्हणून ही पाहणी करण्यात आली. यावेळी प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सिंचन विभाग यांना तातडीने आवश्यक खबरदारीची उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.यास्थळी प्रांताधिकारी (भुसावळ), तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) श्री. रावळ, सिंचन विभागाच्या सौ. कुलकर्णी, तसेच कंत्राटदार श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते.

प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात प्रवेश न करण्याचा सल्ला देण्यात आला असून प्रशासनाच्या सूचना व इशाऱ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी, विभागांतील समन्वय आणि सततची देखरेख सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या