पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- खान्देशातील लेकीला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी खान्देशातील बांधव व सर्व समाज मंडळांच्या वतीने शांततामय निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. दिव्या सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा मोर्चा रविवारी, २४ ऑगस्ट २०२५ रोजी काढण्यात येणार आहे.
मोर्चाचे रूपरेषा :
पायी मूक मोर्चा : रेल्वे विहार, बीजलीनगर येथून चिंतामणी चौकापर्यंत
सकाळी १०:३० ते दुपारी १२:००
शांततापूर्ण दुचाकी मोर्चा : चिंतामणी चौक ते वाकड पोलीस स्टेशन
दुपारी १२:०० ते १२:३०
निवेदन व श्रद्धांजली मौन : वाकड पोलीस स्टेशन
दुपारी १२:३० ते १२:४०
दिव्या सूर्यवंशी यांच्या निधनाने संपूर्ण खान्देशात हळहळ व्यक्त होत असून, “खान्देशच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, दोषींना योग्य ते शासन झालेच पाहिजे” अशी ठाम भूमिका समाजातील सर्व स्तरांतून मांडली जात आहे. दिव्याचा जुळा भाऊ देखील या मोर्चात उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
शोकाकुल आयोजक :
सर्व खान्देश बांधव व सर्व समाज मंडळे