Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगावखेडी फाट्याजवळील तरूणाच्या मृत्यू प्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

खेडी फाट्याजवळील तरूणाच्या मृत्यू प्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव तालुक्यातील खेडी फाट्याजवळ १४ सप्टेंबर रोजी दुचाकीला धडक दिल्यामुळे भानुदास गोपाल जाधव (रा. कानळदा) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तरूणाच्या मृत्यू प्रकरणी धडक देणाऱ्या चारचाकी चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर रोजी रात्री भानुदास जाधव हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १९, डीझेड ७९६१) जळगावकडून चोपड्याकडे जात असताना खेडी फाट्याच्या अलीकडे समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच ३९, जे ११४५) धडक दिली होती. त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला व तोंडाला गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन ते जागीच ठार झाले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ देविदास जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ गुलाब माळी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या