Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeजळगावखुबचंद सागरमल विद्यालय शाळेत निघाला साप, मुले म्हणाली, अरे बाप रे बाप..!

खुबचंद सागरमल विद्यालय शाळेत निघाला साप, मुले म्हणाली, अरे बाप रे बाप..!

जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील शिवाजी नगर येथे असलेल्या खुबचंद सागरमल विद्यालय शाळेतील कंपाऊंड साप शिरताना सरांनी व विद्यार्थ्यांनी पाहिला अन् अचानकपणे सर्प दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच गाेंधळ सुरू झाला.याची माहिती शाळेत असलेले शिक्षक प्रवीण पाटील यांना दिली. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

शिक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितलेला प्रसंग…
हा प्रसंग पाहून शिक्षक प्रवीण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्पमित्र मयूर वाघुळदे ,रवींद्र भोई यांना फाेन केला. दादा आपल्या शाळेत भला माेठा साप आला आहे. तुम्ही तातडीने या, असे म्हटले. यावेळी सर्पमित्र मयूर वाघुळदे यांनी सापाला मारू नका, गाेंधळ करू नका, मी अवघ्या दहा मिनिटात शाळेत पाेहोचताे. काही वेळामध्ये शाळेत दाखल झाले. विद्यार्थी, शिक्षकांनी त्यांना साप दाखविला. यावेळी त्यांनी शाळा परिसरात असलेल्या तस्कर जातीच्या बिनविषारी सापाला पकडले. त्याला एका बरणीमध्ये अलगदपणे बंद केले. अचानकपणे सर्पदर्शन झाल्याने विद्यार्थी, शिक्षक शाळा परिसरात एकच गर्दी केली हाेती.

सापाबद्दल मनामध्ये असलेले गैरसमज दूर…

शाळेत भरदुपारी भलामाेठा, लांबच लांब साप पाहून विद्यार्थी घाबरले हाेते. शिवाय, शिवाजी नगर मधील पालक, गाेंधळलेल्या स्थितीत शाळेच्या आवारात थांबले हाेते. दहा मिनिटांमध्ये सर्पमित्र मयूर वाघुळदे व रवींद्र भोई यांनी तस्कर जातीच्या बिनविषारी सापाला काही वेळात पकडले. त्याला एका बरणीत बंद केले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. साप हा मानवाचा शत्रू नसून ताे मित्र आहे. सापाबद्दल मनात असलेले गैरसमज प्रबाेधन करून त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. साप दिसल्यानंतर त्यास न मारता सर्पमित्राला बाेलावून घ्यावे. ते पकडतील आणि त्याला दूर जंगलात नेऊन साेडतील. या सर्व प्रबाेधनानंतर विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा जीव भांड्यात पडला.
जळगाव शहरात कुठेही साप अथवा कोणताही वन्यप्राणी निघाल्यास त्वरित संपर्क साधावा
मोबाईल नो :- सर्पमित्र मयूर वाघुळदे 8999441779
सर्पमित्र रवींद्र भोई :-8668357169

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या