Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeआरोग्यकोरोनाच्या जेएन.१ या उपप्रकाराबाबत चिंता...! घाबरू नका, मात्र काळजी घ्या: केंद्र सरकारचा...

कोरोनाच्या जेएन.१ या उपप्रकाराबाबत चिंता…! घाबरू नका, मात्र काळजी घ्या: केंद्र सरकारचा अलर्ट

नवी दिल्ली/वृत्तसेवा:- कोरोनाची भीती संपलेली असताना आता पुन्हा कोरोनाचा उपप्रकार समोर आला आहे..पुन्हा भीतीदायक वातावरण निर्माण होते आहे. या कोरोनाच्या नवीन उपप्रकाराचा संसर्ग हा वाढत असल्याने आढळून आले असले तरी याला घाबरण्याची गरज नाही. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज केले आहे.

जगभरात कोरोनाच्या जेएन.१ या उपप्रकाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असतांनाच ख्रिसमस आणि नववर्षापूर्वी देशात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. केरळमध्ये पहिला संसर्ग आढळून आला.याच्या पाठोपाठ महाराष्ट्रातही रूग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.या उच्चस्तरीय बैठकीत कोरोनाच्या नवीन प्रकाराचा संसर्ग होण्याचा धोका आणि त्याला तोंड देण्याची तयारी यावर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, या विषाणूपासून सावध राहण्याची गरज आहे, परंतू घाबरण्याची गरज नाही. या विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्याने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. लवकरच रुग्णालये सज्जतेसाठी मॉक ड्रिल सुरू करतील आणि राज्यांना बाहेरून येणार्‍या लोकांसाठी पुरेशा प्रमाणात चाचण्या वाढवाव्या लागतील.

दरम्यान, आजच्या बैठकीत आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले.वाढत्या केसेस आणि नवीन प्रकारांमुळे बोलावलेल्या या बैठकीत आसाम, अरुणाचल, दिल्ली, हरियाणा, हिमाचल, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, गोवा, पुद्दुचेरी, तेलंगणा, कर्नाटक, मणिपूर, केरळ या राज्यांसह इतर राज्यांचे आरोग्य अधिकारी डॉ. मंत्री उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आपल्या आरोग्य बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी देशात कोरोनाचे २८८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या विषाणूमुळे यूपीमध्ये एक आणि केरळमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण १९७० पेक्षा जास्त झाले आहेत. ही आकडेवारी काही प्रमाणात चिंताजनक आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या