Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeचाळीसगावबफर साठा असूनही विक्रीस नकार ; पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

बफर साठा असूनही विक्रीस नकार ; पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात खत व बियाण्यांचा पुरेसा बफर साठा उपलब्ध असतानाही काही कृषी केंद्रांनी शेतकऱ्यांना माल विकण्यास नकार दिल्याच्या तक्रारींची दखल घेत, कृषी विभागाने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, आणखी तीन प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील तपासणी पथकाने विविध तालुक्यांमध्ये तपासणी केली. यामध्ये बफर साठा असूनही माल न विकणे, विनापरवाना साठवणूक व विक्री आढळून आली. विशेषतः चोपडा तालुक्यातील एका केंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचे ठळक मुद्दे:
बफर साठा असूनही विक्री न करणे, विनापरवाना खत-बियाण्यांची साठवणूक, चोपडा तालुक्यात विनापरवाना विक्री – गुन्हा दाखल, परवाना निलंबित झालेली कृषी केंद्रे:
चोपडा तालुका – २ केंद्रे, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड – प्रत्येकी १ केंद्र,

रोपवाटिकेतील अनियमितताही उघड
जळगाव शहरालगत एका रोपवाटिकेतही बियाणे व औषधांबाबत अनियमितता आढळल्याने त्या परवानाधारकास सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, तो अनुपस्थित राहिल्यामुळे पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया:
“शेतकऱ्यांना योग्य दरात व वेळेवर बियाणे-खते उपलब्ध व्हावेत, यासाठी ही कारवाई करण्यात आली असून दोषींवर कठोर पावले उचलली जातील.”
श्री. विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या