Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावकृषिकन्या कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीचा बहिणाबाई उद्यानात कार्यक्रम; साहित्यिक-रसिकांची उपस्थिती

कृषिकन्या कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीचा बहिणाबाई उद्यानात कार्यक्रम; साहित्यिक-रसिकांची उपस्थिती

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक संघ ,लेवा गणबोली साहित्य मंडळ आणि बहिणाबाई ब्रिगेड तसेच इतर संस्थेतर्फे आज २४ ऑगष्ट, गुरुवार रोजी निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती मोठ्या उत्साहात बहिणाबाई उद्यानात साजरी करण्यात आली. जळगावचे प्रथम महापौर आशाताई कोल्हे व माजी महापौर सिमाताई भोळे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर साहित्यिक यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते व कवी तुषार वाघुळदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. उद्यानात बहिणाबाईंची गाणी सुमधुर आवाजात सुरू होती. पुतळ्यासमोर अतिशय सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. परिसर स्वच्छ करण्यात येऊन पुतळ्याजवळ पुष्प व पाकळ्यांनी सजावट केलेली होती. एकंदरीत वातावरण प्रसन्न दिसून येत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता येवले यांनी केले. याप्रसंगी प्रसिद्ध निवेदक, लेखक ,जेष्ठ पत्रकार आणि लेवा गनबोली साहित्य मंडळाचे संस्थापक सचिव तुषार वाघुळदे यांनी बहिणाबाई यांच्याबद्दल माहिती विशद करून स्मारकाबद्दल सांगितले. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप भोळे यांनी मनोगत व्यक्त केले . लेवा गणबोलीच्या अभ्यासक प्रा.संध्या महाजन यांनी कवयित्री बहिणाबाईच्या जीवनावर आधारीत स्वरचित कविता सादर केली तर प्रकाश पाटील यांनी ” अरे खोप्यामगी खोपा “… ही कवयित्री बहिणाबाईची कविता सादर केली. पत्रकार,लेखक सामाजिक कार्यकर्ते श्री. तुषार वाघुळदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सौ वैशाली झोपे यांची बहिणाबाई ब्रिगेडच्या जळगांव महानगराध्यक्षा म्हणून प्रदेशाध्यक्षा श्रीमती आशाताईं कोल्हे यांनी नियुक्ती केली. तसेच अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित लेवा पाटीदार जेष्ठ नागरिक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी पी.के पाटील (सेवानिवृत्त कृषी उपसंचालक) यांची निवड प्रदीप भोळे यांनी केली.या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तसेच याप्रसंगी कार्यक्रमाला प्रदेश सदस्य प्रदीप रोटे , निखिल रडे , नगरसेवक विरान खडके, संजय सी.पाटील ,मधुकर भंगाळे, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे ,अतुल महाजन ,अविनाश भोळे, सुरेश फालक, सुधीर चौधरी, राजेश बोरसे, रिटायर्ड. तहसीलदार व्ही.डी बिऱ्हाडे, ‘दिव्यमराठी’चे योगेश वाणी ,दीपक शिरणामे, तसेच माजी महापौर सिमाताई भोळे, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा हर्षा बोरोले, साधना लोखंडे,कांचन आटाळे,पुष्पा पाटील, योगिनी बेडाळे, व साहित्य प्रेमी,रसिक इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या