Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमकुसुंबा शिवारात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद : एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कुसुंबा शिवारात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद : एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजता कुसुंबा गाव परिसरात गावठी पिस्टल जवळ बाळगणारा एक इसम एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे परिसरात पसरलेली दहशतीची छाया संपुष्टात आली असून पोलिसांच्या तात्काळ हालचालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कुसुंबा गावातील दोस्ती पान सेंटर समोर एक इसम लोकांना पिस्टलचा धाक दाखवून दहशत माजवीत असल्याचे समजले. मिळालेल्या आदेशानुसार पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, पोका गणेश ठाकरे, पोका किरण पाटील, पोका नितीन ठाकुर व पोका राहुल घेते हे घटनास्थळी रवाना झाले.

पोलिस पथक घटनास्थळावर पोहोचताच संशयिताने पोलिस गाडी पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनी शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीअंती त्याने आपले नाव अमोल सुरेश खैरनार (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीदरम्यान डाव्या कमरेला लावलेला गावठी कट्टा पोलिसांच्या नजरेस पडला.

पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्याकडून गावठी कट्टा (किंमत अंदाजे १०,००० रुपये) जप्त केला. या प्रकरणी पोलिस शिपाई राहुल घेते यांनी सरकार तर्फे एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून,त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचा पुढील तपास पोहेकॉ/२९२२ रामदास कुंभार करीत आहेत. संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या