Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याला.ना.विद्यालयातील विद्यार्थांनी अनुभवली अंतराळ सफर..

ला.ना.विद्यालयातील विद्यार्थांनी अनुभवली अंतराळ सफर..

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेठ ला. ना. सा.विद्यालयातील विद्यार्थांनी अनुभवली अंतराळ सफर जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत खगोल अभ्यासक तथा शाळेचे माजी विद्यार्थी अमोघ जोशी यांनी भैय्यासाहेब गंधे सभागृहात,” अंतरिक्षाची सफर” या विषयावर सेमिनार घेऊन इ.5 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना सूर्यमाला, त्यातील ग्रह, उपग्रह, अंतराळवीर, चांद्रयान मोहिम, मंगळयान मोहीम, या बाबत एल.सी.डी. प्रोजेक्टच्या सहाय्याने सोप्या भाषेत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थांना अंतराळ सफर घडवून आणली.

तसेच त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.या वेळेस व्यासपीठावर त्यांचे सोबत शाळेचे मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप,पर्यवेक्षक संजय वानखेडे,मु.जे.महाविद्यालयाचे सेवानिवृत प्रा.दिलीप भारंबे, विवेकानंद प्रतिष्ठान चे प्रा.उमेश इंगळे आदी उपस्थित होते.या वेळेस शाळेचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी विद्यार्थांनी आपली निरीक्षण शक्ती, संशोधन रुची, सृजनशीलता वाढवून, अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानचा अभ्यास करण्याचेआवाहन केले. या उपक्रमाचे सुत्रसंचलन योगेश सोनजे यांनी तर प्रमुख अतिथींचा परिचय जागृती मोराणकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ.मनिषा पवार यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या