Tuesday, October 21, 2025
police dakshta logo
Homeजळगावशेठ ला.ना. सा.विद्यालयात राष्ट्रपिता म.गांधी व माजी पंतप्रधान शास्त्री यांची जयंती साजरी

शेठ ला.ना. सा.विद्यालयात राष्ट्रपिता म.गांधी व माजी पंतप्रधान शास्त्री यांची जयंती साजरी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृह येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उप मुख्याध्यापक प्रशांत जगताप,पर्यवेक्षक संजय वानखेडे पर्यवेक्षिका रमा तारे या सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्मिता करे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.शाळेचे जेष्ठ शिक्षक ए.व्ही.चौधरी आणि पी.आर.सोनवणे यांनी “वैष्णव जन तो” हे गीत गाऊन या दोन महान व्यक्तींना वंदन केले.यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचे वर्णन केले.

शाळेतील शिक्षिका मधुश्री मदाने यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधींची थोरवी वर्णन केली तर मनीषा पवार यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या धाडसी आणि कुशल प्रशासकीय कार्याची माहिती दिली. पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तसेच माननीय मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांनी या थोर नेत्यांचे गुण कसे अंगीकारले पाहिजे ,त्या बाबतीत मार्गदर्शन केले. योगेश सोनजे सरांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता आठवीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी केले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या