Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यालाडक्या बहिणींना दिलासा : थकीत तीन महिन्यांचा ४५०० रुपयांचा हप्ता एकत्र जमा...

लाडक्या बहिणींना दिलासा : थकीत तीन महिन्यांचा ४५०० रुपयांचा हप्ता एकत्र जमा होणार..!

मुंबई | वृत्तसेवा : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेअभावी थांबविण्यात आलेले नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांचे थकीत हप्ते एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अनेक लाभार्थी महिलांचे ई-केवायसी वेळेत पूर्ण न झाल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे काही महिन्यांचे हप्ते अडकले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांमध्ये नाराजी दिसून आली, तर काही भागांत आंदोलनही झाले होते.

या प्रकरणाची दखल घेत महिला व बालविकास विभागाने संबंधित लाभार्थींच्या अर्जांची सखोल पडताळणी सुरू केली आहे. नियम व अटींचे उल्लंघन करून सादर केलेल्या अर्जांची तपासणी तसेच लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर आता पात्र महिलांना थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयानुसार, ज्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तिन्ही महिन्यांचे हप्ते मिळाले नव्हते, त्यांच्या खात्यात एकत्रित ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत. तर ज्या महिलांना यापूर्वी दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत, त्यांना केवळ जानेवारी महिन्याचा एकच हप्ता देण्यात येणार आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता भविष्यात १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात सकारात्मक संकेत दिले असून, हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या