जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- बृहन लेवा समाज मंडळ आणि अ.भा.लेवा पाटीदार समाज महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दी आर्यन फार्म, शिरसोली रोड, जळगाव येथे प्रथमच विवाह इच्छुक वधु वरांसाठी पिकनिक कम गेट टुगेदर चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम leva Single’s Mega Picnic Event या थिमच्या अंतर्गत घेण्यात आला. या प्रकारच्या पिकनिक कम गेट टुगेदर कार्यक्रमाला दोनशेहून अधिक विवाहेच्छुक मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम औपचारिक कार्यक्रम पार पडल्या नंतर वर मुलांची व पालकांची बैठक व्यवस्था वेगवेगळी करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या वेळी वर व वधू यांच्या एकमेकांच्या विचार जाणून घेता यावेत या साठी वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाचे आयोजन केले गेले होते त्या प्रकारे खेळ घेण्यात आले.विवाह, संसार, जबाबदाऱ्या, भविष्यातील आव्हाने तसेच संकटे या सर्व गोष्टी खेळाच्या माध्यमातून संवाद साधून खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. सौ. सीमा गाजरे आणि सौ. कामिनी धांडे, सौ. वनिता चौधरी यांनी या दरम्यान आलेल्या समस्यांचे समुपदेशन केले. या कार्यक्रमात पालक मंडळी सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होती. वधू वरांच्या पालकांसाठीही वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम सत्रात डॉ. प्रमोद महाजन यांनी आपल्या मुलामुलींचे विवाह करतांना पालकांनी काय करायला हवे तसेच लग्न जुळविताना आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी मध्यस्तांची आवश्यकता किती महत्वाची आहे.आणि त्यासाठी आपसातील नाते संबंध दृढ करणे किती अत्यावश्यक आहे, या गोष्टींचे महत्व पटवून दिले. सोबत संवाद साधत पालकांना बोलते केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पालकांना एका खेळाद्वारे समाजात असणाऱ्या विविध समस्या लीहलेल्या चिठ्ठी देण्यात आल्या व त्यावर त्यांचे स्वतःचे मनोगत मांडावयास सांगण्यात आले. या खेळाचा उद्देश्य हा समाजातील समस्या सोडविण्यासाठी पालकांना सक्षम करणे व त्यांना या विषयी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही बाजूच्या पालकांचे तसेच मुलामुलींचे विचार जाणून घेऊन त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावर तोडगा काढण्याबद्दल माहिती देण्यात आली तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचीही समाधानकारक उत्तरे देण्यात आली. हा कार्यक्रम सौ.दिप्ती राणे महाजन यांनी यशस्वीरीत्या हाताळला. या कार्यक्रमात लेवा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला भालचंद्र चौधरी जळगांव, राजीव दादा चौधरी कॅनडा, दी आर्यन फार्मचे संचालक मनोज चौधरी जळगांव तसेच कार्यक्रमाला साऊंड सिस्टीमसाठी महेश चिरमाडे यांनी उपलब्ध करून दिले. तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापनाची जबाबदारी कुणाल सुरेश भोळे यांनी पार पाडली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सविता भोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ॲड.भारती ढाके यांच्या स्वामिनी फाउंडेशन आणि डॉ. भावना चौधरी यांच्या लेवा सखी घे भरारीच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध रीतीने, आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.
या मंडळाच्या कार्यकारी मंडळात
अध्यक्ष सौ. प्रतीक्षा नारखेडे डोंबिवली, उपाध्यक्ष उल्हास पाटील वरणगाव, सचिव हरिष तळेले बडोदा, खजिनदार संजय चौधरी बडोदा, राजीव चौधरी कॅनडा, रमेश पाटील मध्यप्रदेश, नोमदास पाटील वाघोदा, नीलिमा पाटील नाशिक असून या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजक जळगाव येथे प्रथमच प्रत्यक्ष एकमेकांना भेटले असून, या सर्वांनी टेकनोलॉजीचा उत्कृष्ठ उपयोग करून आदर्श घालून दिला आहे. हे सर्वजण आजपर्यंत फोनवरच विचार विनिमय, नियोजन तसेच चर्चा करत होते.भविष्यात अजून खूप काही करण्याचे आणि निःस्वार्थ भावनेने असे सामाजिक कार्यक्रम करण्याचे त्यांचे नियोजन आहे.