Tuesday, November 12, 2024
police dakshta logo
Homeजळगावअ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित लेवा पाटीदार वधू-वर परिचय संमेलन उत्साहात..

अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित लेवा पाटीदार वधू-वर परिचय संमेलन उत्साहात..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित लेवा पाटीदार वधू वर परिचय संमेलन संतोषीमात बाहुउद्देशीय हॉल येथे झाला.

त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सकल लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील तर प्रमुख पाहुणे खासदार रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळचे सभापती अनिल वारके, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, संतोषीमाता सोसायटीचे चेअरमन वासुदेव इंगळे, ग.स.सोसायटीचे कर्ज समितीचे अध्यक्ष योगेश इंगळे, बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे ,बहिणाई ब्रिगेडच्या जळगाव महानगराध्यक्ष वैशाली झोपे, लेवा पाटीदार युवक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, प्रदीप भोळे, शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, भोरगाव लेवा पंचायत सदस्य सुधीर गंगाधर पाटील, डॉ.बाळू पाटील, अशोक चौधरी, यादवराव बऱ्हाटे, आरती चौधरी, मंगला पाटील,स्वाती भोळे, नीला चौधरी, माजी नगरसेवक पुरुषोत्तम भाऊ नारखेडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमास समाजातील भुसावळ, जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई, गुजरात, औरंगाबाद आदी ठिकाणांवरून समाज बांधव उपस्थित होते.याप्रसंगी आमदार सावकारे यांनी बिझनेस करणाऱ्या युवकांना सुद्धा निवडीत प्राधान्य द्यावे. युवकांना ड्रग्ज पासून दूर ठेवावे असे मार्गदर्शन मनोगतात व्यक्त केले.त्याचप्रमाणे खासदार रक्षा खडसे यांनी शेतकरी सुद्धा चांगले कमावतात आणि शेतकी शिक्षण घेऊन मुले मोठी कमाई करतात ,म्हणून शेतकरी मुलाला सुद्धा प्राधान्य द्यावे असे मनोगत व्यक्त केले. तसेच कुटुंबप्रमुख रमेश दादा पाटील यांनी ‘ संसार तुटू नयेत म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे ,आई वडिलांनी आणि बहिणीने मुलांच्या संसारात ढवळाढवळ कमी केली पाहिजे ‘ असे मनोगतात सांगितले.

या प्रसंगी समाजातील मुला,मुलींची माहिती असलेल्या सुचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक – अँडव्होकेट प्रकाश पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार – जीवन महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र वाणी,प्रदेश संघटक रुपेश चौधरी जिल्हाध्यक्ष श्याम भारंबे कार्याध्यक्ष प्रवीण पाटील, कल्पेश पाटील ,राहुल नेमाडे ,कोमल चौधरी ,ओम वाणी, गणेश चौधरी, ऋतिक फालक _अभिराज वाणी, निलेश राणे ,पंकज वाणी _उल्हास पाटील, गिरीश पाटील, पार्थ अंबोले, गिरीश चौधरी, संकल्प वाणी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या